मुंबई: राज्यात आज ४३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३६ हजार ९८५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २२३ मृत्यू हे मुंबई मनपा-३९, ठाणे-५, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजापूर मनपा-११, मीरा-भाईंदर मनपा-१३, वसई-विरार मनपा-९, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-६, मालेगाव मनपा-३, धुळे-१, जळगाव-१७, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-११, सोलापूर-१, सोलापूर मनपा-६, सातारा-४, कोल्हापूर-२, सांगली-१, औरंगाबाद मनपा-९, जालना-८, लातूर-१, लातूर मनपा-२, नांतेड-१, नांदेड मनपा-१, अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील २ अशी नोंद आहे.