मुंबई: राज्यात आज २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.७ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९१ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २५८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-१२, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-१४, कल्याण-डोंबिवली मनपा-१४, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, मीरा-भाईंदर मनपा- ५, पालघर-१, वसई-विरार मनपा-११, रायगड-७, पनवेल मनपा-१, नाशिक-७, नाशिक मनपा-१८, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, जळगाव-३, जळगाव मनपा-१, पुणे-७, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-१७, सोलापूर मनपा-३, सोलापूर मनपा-६, सातारा-५, कोल्हापूर-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-३, जालना-४, हिंगोली-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-२, बीड-१, नांदेड-३, नांदेड मनपा-३, अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.