मुंबई: राज्यात आज ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ६५ हजार ६६३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३४८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २३ हजार ३७७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख २२ हजार ५६४ नमुन्यांपैकी ३ लाख ९३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.७६टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ४० हजार ८८४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ५५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १४४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८५ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले १४४ मृत्यू हे मुंबई मनपा-६५, ठाणे-१, नवी मुंबई मनपा-१, कल्याण-डोंबिवली मनपा-६, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-८, रायगड-१, नाशिक-२, नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१, पुणे-९, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-७, सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, रत्नागिरी-५, औरंगाबाद मनपा-४, लातूर-१, उस्मानाबाद-१, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.