पुणे: पुणे विभागातील 17 हजार 911 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 हजार 697 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 10 हजार 652 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 1134 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 537 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.82 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 24 हजार 558 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 14 हजार 494 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 274 आहे. कोरोनाबाधित एकूण 790 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 405 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.02 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.22 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 449 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1237, सातारा जिल्ह्यात 95, सोलापूर जिल्ह्यात 83, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 18 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1145 रुग्ण असून 743 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 355 आहे. कोरोनाबाधित एकूण 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 727 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 710 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 744 आहे. कोरोनाबाधित एकूण 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 399 रुग्ण असून 239 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 148 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 868 कोरोनाबाधित रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 131 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.