पुणे: पुणे विभागातील 18 हजार 824 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31 हजार 31 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 11 हजार 51 आहे. विभागात कोरोनाबाधित एकेण 1156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 600 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.66 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.73 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 25 हजार 732 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 15 हजार 364 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 560 आहे. कोरोनाबाधित एकूण 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 420 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.71 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.14 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 334 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 174, सातारा जिल्ह्यात 43, सोलापूर जिल्ह्यात 86, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 20 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1188 रुग्ण असून 757 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 383 आहे. कोरोनाबाधित एकूण 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हायातील 2 हजार 813 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 724 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 813 आहे. कोरोनाबाधित एकूण 276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 410 रुग्ण असून 254 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 144 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 888 कोरोनाबाधित रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 151 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.