# पुणे विभागात आज 971 रूग्णांची वाढ; एकूण 33 हजार 857 कोरोनाबाधित.

पुणे: पुणे विभागातील 20 हजार 341 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33 हजार 857 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 12 हजार 291 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 225 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 617 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. मृत्यूचे प्रमाण 3.62 टक्के तर ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.08 टक्के इतके असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 28 हजार 47 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 16 हजार 723 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 467 आहे. कोरोनाबाधित एकूण 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 463 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.62 टक्के आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 971 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 767, सातारा जिल्ह्यात 53, सोलापूर जिल्ह्यात 101, सांगली जिल्ह्यात 13 तर कोल्हापूर जिल्ह्यात 37 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 304 रुग्ण असून 784 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 465 आहे. कोरोनाबाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 102 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 834 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 979 आहे. कोरोनाबाधित एकूण 289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 463 रुग्ण असून 262 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 189 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 941 कोरोनाबाधित रुग्ण असून 738 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 191 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *