पुणे: पुणे विभागातील 22 हजार 48 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36 हजार 671 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 13 हजार 342 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 281 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 702 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.12 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.49 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात 30 हजार 425 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 18 हजार 395 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 135 आहे. कोरोनाबाधित एकूण 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 494 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.46 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.94 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 262 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 22, सातारा जिल्ह्यात 38, सोलापूर जिल्ह्यात 160, सांगली जिल्ह्यात 25 तर कोल्हापूर जिल्ह्यात 17 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित 1 हजार 372 रुग्ण असून 813 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 504 आहे. कोरोनाबाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 371 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 825 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 242 आहे. कोरोनाबाधित एकूण 304 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित 520 रुग्ण असून 270 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 237 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 983 कोरोनाबाधित रुग्ण असून 745 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 224 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.