पुणे: पुणे विभागातील 23 हजार 88 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 हजार 411 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 14 हजार 2 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 321 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 615 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.11 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.44 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात 31 हजार 994 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 19 हजार 319 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 751 आहे. कोरोनाबाधित एकूण 924 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 450 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.38 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.89 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 740 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 569, सातारा जिल्ह्यात 46, सोलापूर जिल्ह्यात 68, सांगली जिल्ह्यात 12 तर कोल्हापूर जिल्ह्यात 45 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित 1 हजार 418 रुग्ण असून 859 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 499 आहे. कोरोनाबाधित एकूण 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 439 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 871 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 309 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित 532 रुग्ण असून 277 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 242 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 28 कोरोनाबाधित रुग्ण असून 762 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 251 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.