पुण्यातही कोरोनाचा कहर; दिवसभरात 4 हजारांवर रूग्णांची भर.

पुणे: पुणे विभागातील 41 हजार 541 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 70 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 27 हजार 130 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 2 हजार 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 824 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.76 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.87 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 58 हजार 27 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 36 हजार 27 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 20 हजार 545 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 14 हजार 748, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 813 व पुणे कॅन्टोन्मेंट 257, खडकी विभागातील 46, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 581, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 100 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 455 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 61, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 236 व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 27, ग्रामीण क्षेत्रातील 68, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 34 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 593 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.09 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.51 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 712 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 14, सातारा जिल्ह्यात 76, सोलापूर जिल्ह्यात 300, सांगली जिल्ह्यात 40 तर कोल्हापूर जिल्ह्यात 282 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 2 हजार 630 रुग्ण असून 1 हजार 32 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 510 आहे. कोरोनाबाधित एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 6 हजार 129 कोरोनाबाधित रुग्ण असून 2 हजार 975 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 769 आहे. कोरोनाबाधित एकूण 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 103 रुग्ण असून 439 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 627 आहे. कोरोना बाधित एकूण 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 2 हजार 812 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 68 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 679 आहे. कोरोनाबाधित एकूण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *