# पुणे विभागात 40 हजारांवर कोरोनाबाधित; आज 1831 रूग्णांची वाढ.

पुणे: पुणे विभागातील 24 हजार 400 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 हजार 242 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 14 हजार 479 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 693 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.63 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.39 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 33 हजार 607 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 20 हजार 485 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 168 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 हजार 356, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 115 व कॅन्टोंन्मेंट 102, खडकी विभागातील 60, ग्रामीण क्षेत्रातील 470, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 65 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 954 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 530 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.95 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.84 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 831 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 613 , सातारा जिल्ह्यात 69, सोलापूर जिल्ह्यात 110, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 23 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 487 रुग्ण असून 886 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 541 ॲक्टीव रुग्ण संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 549 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 970 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 262 आहे. कोरोनाबाधित एकूण 317 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 548 रुग्ण असून 282 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 252 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 51 कोरोनाबाधित रुग्ण असून 777 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 256 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *