पुणे: पुणे विभागातील 25 हजार 507 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42 हजार 433 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 15हजार 525 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 1हजार 401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 743 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.11 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.30 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 35 हजार 528 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 21हजार 411 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13हजार 132 आहे. या मध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 9हजार 770, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2हजार 636 व कॅन्टोन्मेंट 91, खडकी विभागातील 60, ग्रामीण क्षेत्रातील 522, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 53 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 985 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानरगपालिका क्षेत्रातील 796 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 94, पुणे कॅन्टोमेन्ट 25, खडकी विभागातील 13, ग्रामीण क्षेत्रातील 37, जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील 20 रुगणांचा समावेश आहे. तसेच 557 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.27 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2हजार 191 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1हजार 921, सातारा जिल्ह्यात 56, सोलापूर जिल्ह्यात 150, सांगली जिल्ह्यात 33 तर कोल्हापूर जिल्ह्यात 31 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1हजार 543 रुग्ण असून 934 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 548 ॲक्टीव रुग्ण संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 3हजार 699 कोरोनाबाधित रुग्ण असून 2हजार 84 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1हजार 296 आहे. कोरोनाबाधित एकूण 319 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 581 रुग्ण असून 282 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 284 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 1हजार 82 कोरोनाबाधित रुग्ण असून 796 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 265 आहे. कोरोनाबाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.