# पुणे जिल्ह्यात आज 58 जणांचा मृत्यू; 3 हजार 917 कोरोनाबाधितांची नोंद.

पुणे: पुणे विभागातील 43 हजार 430 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 75 हजार 288 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 29 हजार 732 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 2 हजार 126 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 815 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.69 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. दरम्यान, पुणे जिल्ह्यात आज 58 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात 36, पिंपरी चिंचवड 16, पुणे ग्रामीणमध्ये 2 तर अन्य 4 रूग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील 61 हजार 944 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 37 हजार 323 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 100 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 11, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 991 व पुणे कॅन्टोन्मेंट 232, खडकी विभागातील 43, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 717, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 106 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 99, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 254 व पुणे कॅन्टोन्मेंट 30, खडकी विभागातील 27, ग्रामीण क्षेत्रातील 73, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 38 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 572 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.25 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.46 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 587 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 917, सातारा जिल्ह्यात 123, सोलापूर जिल्ह्यात 198, सांगली जिल्ह्यात 79 तर कोल्हापूर जिल्ह्यात 270 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 2 हजार 753 रुग्ण असून 1 हजार 495 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 165 आहे. कोरोनाबाधित एकूण 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 6 हजार 327 कोरोनाबाधित रुग्ण असून 3 हजार 70 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 857 आहे. कोरोनाबाधित एकूण 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 182 रुग्ण असून 459 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 681 आहे. कोरोनाबाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार 82 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 83 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 929 आहे. कोरोनाबाधित एकूण 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *