# पुणे विभागात आज 2हजार 490रूग्णांची वाढ; एकूण 58हजार 98कोरोनाबाधित.

पुणे: पुणे विभागातील 35 हजार 538 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 58 हजार 98 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 20 हजार 803 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 755 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.17 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.02 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 48 हजार 192 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 30 हजार 283 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 656 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 11 हजार 568, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 473 व पुणे कॅन्टोन्मेंट 152, खडकी विभागातील 48, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 324, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 91 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 253 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 942, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 174 व पुणे कॅन्टोन्मेंट 29, खडकी विभागातील 21, ग्रामीण क्षेत्रातील 59, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 28रुग्णांचा समावेश आहे. तसेच 500 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.84 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 490 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 916 , सातारा जिल्ह्यात 70, सोलापूर जिल्ह्यात 232, सांगली जिल्ह्यात 50 तर कोल्हापूर जिल्ह्यात 222 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 2 हजार 214 रुग्ण असून 1 हजार 225 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 916 आहे. कोरोनाबाधित एकूण 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 941 कोरोनाबाधित रुग्ण असून 2 हजार 642 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 936 आहे. कोरोनाबाधित एकूण 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 891 रुग्ण असून 417 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 449 आहे. कोरोनाबाधित एकूण 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 860 कोरोनाबाधित रुग्ण असून 971 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 846 आहे. कोरोनाबाधित एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *