# गृहविलगीकरणात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे व्हॉटस् ॲपद्वारे समुपदेशन.

औरंगाबाद : गृह विलगीकरणात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या शंकांचे निरसन आणि समुपदेशन आता व्हॉटस् ॲप द्वारे निःशुल्क करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वार्धक्यशास्त्र विभागाच्या मदतीने हे मार्गदर्शनाचे काम होणार आहे. गृह विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांना काही अडचणी असतील तर https://chat.whatsapp.com/K1YoFNluy5kAV2nNih3tWi या लिंकला कॉपी करुन व्हाटस् ग्रुपला सहभागी होऊ शकतात आणि मॅसेज टाकू शकतात. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत डॉक्टरांना जसा वेळ मिळेल तसे प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील. रुग्ण या ग्रुप मध्ये दहा दिवसांपर्यंत सहभागी होऊ शकतात.

रुग्णांवर उपचार व काळजी त्यांचे स्वत:चे मुळ डॉक्टर ज्यांनी त्यांना गृहविलगीकरणाचा सल्ला दिला आहे तेच घेतील. या व्यतिरिक्त रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांना काही माहिती हवी असल्यास, शंका निरसन करावयाचे असल्यास ते या ग्रुपवर केले जाईल. हा सेवाभावी ग्रुप फक्त आपल्या शंकांचे निरसण करण्यासाठी आणि योग्य माहिती देण्यासाठी आहे. ज्यांना व्हॉटस्ॲप करणे शक्य नसेल किंवा लिंकद्वारे ग्रुपमध्ये सहभागी होता येत नाही त्यांनी 09665986302, 09096540840, 09987528024, 09152126263, 08275303956 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर सकाळी 11.00 ते दुपारी 01.00, या वेळेतच संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *