संग्रहित छायाचित्र
पुणे: पुणे शहरात आज दिनांक 22 मे पासून सायंकाळी 7 वाजेनंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास कलम 188 नुसार कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्तांनी या आदेशान्वये देण्यात आला आहे.
आपल्या भागातील नागरिकांनी कोणत्याही व कसल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 31 मे पर्यंत रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत वाहन घेऊन अथवा पायी बाहेर पडल्यास कलम 188 नुसार कारवाई होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुणे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी हे ‘रात्रीचे संचारबंदी’चे नवे आदेश काढले आहेत.