दगडू लोमटे यांच्या ‘राहून गेलेली पत्रे’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

अंबाजोगाई: दगडू लोमटे लिखित ‘राहून गेलेली पत्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, एक ऑगस्ट रोजी साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी, गांधीवादी विचारवंत प्राचार्य सोमनाथ रोडे यांच्या हस्ते व मुक्त पत्रकार व साहित्यिक अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली  होणार आहे. ही माहिती मसापचे सचिव गोरख शेंद्रे व प्रतिमा पब्लिकेशन पुणेचे प्रकाशक डॉ. दीपक चांदणे यांनी दिली आहे.

दगडू लोमटे यांनी ‘राहून गेलेली पत्रे’ या सदरात महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत, पत्रकार, अभिनेते, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना दीर्घ पत्रांची मालिका लिहिली होती. त्याला अनेक मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंक, दैनिके, पाक्षिके व फेसबुक, फेसबुक पेज व वेबपेज वरून प्रकाशित झाली होती. त्याचे पुस्तक रूपाने ते प्रतिमा पब्लिकेशन पुण्याच्या वतीने प्रकाशित होत आहे.  दगडू लोमटे यांचे हे पहिलेच पुस्तक प्रकाशित होत आहे. या समारंभात अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे व मसाप केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य प्रा. किरण सगर, मसाप केंद्रीय कार्यकारणी सदस्य व नाट्य लेखक डॉ. सतीश साळुंके, नव्या पिढीचे लेखक बालाजी सुतार, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते भगवानराव बप्पा शिंदे, ज्येष्ठ नेते नंदकुमार मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, केंद्र बीडचे सचिव डॉ. नरेंद्र काळे, वेणूताई चव्हाण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सतीश नाना लोमटे यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकशित होणार आहे.

सोमवार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृहात हा प्रकाशन समारंभ होणार आहे. तरी नागरीक, रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मसापचे अध्यक्ष व लेखक दगडू लोमटे, सचिव गोरख शेंद्रे, उपाध्यक्ष डॉ. राहुल धाकडे, कोषाध्यक्षा डॉ. शैलजा बरुरे, मसाप कार्यकारिणीचे सदस्य व प्रतिमा पब्लिकेशनचे प्रकाशक डॉ. दीपक चांदणे, अस्मिता चांदणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *