पुणे: राज्यात ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या टप्प्यात राज्याच्या सर्वच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली असून, आतापर्यंत 85.48 टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी 74.94 टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षीपेक्षा सुमारे 11 टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. राज्यातील एकूण धरणांपैकी सुमारे 65 हून अधिक धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात व ऑक्टोबर महिन्यातील गेल्या काही दिवसात राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली. अगदी कायम दुष्काळी असलेल्या भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे या भागातील नद्या-नाले, ओढे पाण्याचे तुंडुंब भरून वाहू लागली आहेत.
राज्यातील धरणांचा पाणीसाठा सध्या सुस्थितीत असून, ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात 85.48 टक्के एवढा आहे. मागील वर्षी याच काळात 74.94 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीपेक्षा सुमारे 11 टक्क्यांनी पाणीसाठा जादा आहे. पाणीसाठ्यामध्ये पुणे, कोकण, तसेच नाशिक विभागातील धरणांची संख्या जास्त आहे. अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद भागातीत धरणांमधील सत्तर टक्क्यांजवळ आहे.
राज्यातील सहा विभागामधील धरणांपैकी सध्या कोकणातील धरणांंमध्ये 84.39 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी 90.01 टक्के पाणीसाठा होता. पुणे विभागात 88.98 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी या विभागात 87.51 टक्के पाणी होता. नाशिक विभागात 88.36 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी या विभागात 81.09 टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या 80.08 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी या विभागात 82.03 टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागातील धरणामध्ये 78.78 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी 56.25 टक्के पाणीसाठा होता. औरंगाबाद विभागात 83.49 टक्क्यांवर पाणीसाठा पोहचला आहे. मागील वर्षी याच दिवसात 42.67 टक्के पाणीसाठा होता.
धरणांतील (साठा टक्केवारीमध्ये)
धरण- सध्याचा साठा- मागील वर्ष
1)अमरावती- 78.78 56.25
2)औरंगाबाद- 83.49 42.67
3)कोकण- 84.39 90.1
4) नागपूर- 80.08 82.03
5)नाशिक- 88.36 81.09
6) पुणे- 88.98 87.51
एकूण- 85.48 74.94
राज्यातील सहा विभागात एकूण 3 हजार 267 धरणे
अमरावती- 446
औरंगाबाद- 964
कोकण- 176
नागपूर- 384
नाशिक- 571
पुणे- 726