अंबाजोगाई: दासू वैद्य यांची कविता जगण्याचं वास्तव सांगणारी, समाजाचं भान जागविणारी कविता आहे असे मत प्रख्यात साहित्यिक बालाजी सुतार यांनी व्यक्त केले.
अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या “संमेलन अध्यक्षा़चे साहित्य” या परिसंवादात अध्यक्ष म्हणून बालाजी सुतार बोलत होते. या परिसंवादात डॉ. दीपक गरुड आणि गोपाळ तिवारी यांनी आपला सहभाग नोंदवला.
आपल्या विस्तारीत मनोगतात बोलताना बालाजी सुतार म्हणाले की, दासू वैद्य यांची कविता ही कोणत्याही चौकटीत न बसू शकणारी स्वतंत्र, सर्वांना सामावून घेणारी, स्वीकारशील, सामाजिक, राजकीय कविता आहे. त्यांची कविता ही साध्या माणसांची कविता बहुसंख्य माणसांच्या जगण्याबध्दलचे वास्तव सांगणारी, जगण्यातील समरसता सांगणारी, तत्वज्ञान, भाषा बद्दल बोलत यांच्या काहीही भाष्य न करणारी आणि तेवढीच तटस्थ आहे. त्यांच्या कवितेत ऊब असते, ओलावा असतो. तर कुठल्याही वादाला स्थान नसणारी, अदखलपात्र माणसांवर लिहिलेल्या दासू वैद्य यांच्या कवितेत दिसतात.
दासू वैद्य यांनी लिहिलेल्या तुर्तास आणि तत्पूर्वी या दोन कविता संग्रहाची तुलना करतांना “तुर्तास” कविता संग्रहातील कविता ही उत्कटता स्वरुपाची आणि “तत्पूर्वी” संग्रहातील कविता ही घराच्या बाहेर आलेली कविता दिसते. त्यांच्या कवितेत माजघर, अंगण आणि संबंध भोवतालच जे अंग आहे त्याच्या बाजारीकरणाचे चित्रिकरण व्यतीत करणारी कविता आहे. दृश्यात्मक शैली हा अंग त्यांच्या कवितेत आहे. सांस्कृतिक घटनांचा संदर्भ, निजामाचा प्रभाव असणारी, खूप सार्या माणसांचा सहभाग असणारी, आई, वडील आणि मुलगी या तीन विषयांवरच्या कविता. “आई गेल्यानंतर चे वडील” ही कविता अत्यंत मोलाची वाटते. तर आई संदर्भात लिहिलेली कविता ही आपले जैविक नातं सांगणारी कविता आहे. ९० टक्के सामान्य लोकांच्या जगण्यावर तर ५ टक्के लोकांच्या जगण्याचं वास्तव सांगणारी कविता आहे असे बालाजी सुतार यांनी सांगितले.
या परिसंवादात डॉ. दीपक गरुड यांनी प्रा. दासू वैद्य यांचे “दृकश्राव्य साहित्य” या विषयावर गोपाळ तिवारी यांनी प्रा. दासू वैद्य यांची “गद्द लेखन” या विषयावर आपली मनोगते नोंदवली. या परिसंवादाचे संयोजन प्रा. डॉ. देविदास खोडेवाड यांनी केले तर आभार संतोष मोहिते यांनी मानले.