संत शिरोमणी सावता माळी महाराज यांचे जन्मगाव अरण येथे भक्तनिवास, वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळा

..धन्य आज दिन, संतांचे दर्शन,
आणिक संत सेवेची संधी ती!

सोलापूर: संत शिरोमणी सावता माळी महाराज यांचे जन्मगाव अरण, जिल्हा सोलापूर येथे भक्तनिवास, वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळा आज पार पडला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस अन्न, नागरी पुरवठा मंत्री ना.श्री.छगन भुजबळ, आमदार श्री.राम शिंदे, आमदार श्री.योगेश टिळेकर, आमदार श्री.सचिन कल्याण शेट्टी, आमदार श्री.राम सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, सावता महाराज वसेकर, महामंडलेश्वर श्री.मनिषानंद, माजी आमदार बळीराम शिरसकर, माजी आमदार श्री.दांडगे, श्री.प्रभू महाराज माळी, पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.

कर्माला प्राधान्य देऊन व्यवहारातून परमार्थ शिकवणाऱ्या संत सावता माळी महाराजांची शिकवण जीवन उद्धारून टाकणारी आहे. या भक्तनिवास वास्तुशिल्पातून अरण येथे भाविकांना एक नवी सुविधा उपलब्ध होणार आहे, असे मंत्री सावे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *