परळीसह अंबाजोगाई बाजार समितीवर धनंजय मुंडेंचे वर्चस्व

बीड: जिल्ह्यातील अंबाजोगाई बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणूकीच्या निकालामध्ये परळीमध्ये माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅनललने निर्विवाद वर्चस्व स्थापन केल्यानंतर अंबाजोगाईत देखील त्यांच्या पॅनलला बहुमत सिद्ध झाले आहे.

अंबाजोगाई बाजार समितीवर राजकिय प्रशासक म्हणून विराजमान झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख यांच्या दोन वर्षाच्या प्रशासकीय काळातील कामकाजाची दखल घेत मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला. बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच माजी पालकमंंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेचे माजी आ.संजय दौड यांनी महाविकास आघाडीचा पॅनल स्थापन करून त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत बाजार समिती महाविकास आघाडीकडे खेचून आणण्यात त्यांना यश आले आहे.

ग्रामपंचायत मतदार संघातून बाळासाहेब उर्फ आनंद देशमुख,  सत्यजीत सिरसाट, तानबा लांडगे, लक्ष्मण करनर तर सोसायटी मतदार संघातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण, रामलिंग चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती विलास सोनवणे,  शिवाजी सोमवंशी,  बालासाहेब सोळंके, आगळे सरस्वती, माजी जिल्हा परिषद सदस्या सुचित्रा देशमुख, खापरटोनचे सरपंच गौतम चाटे, कानडीचे सोसायटीचे चेअरमन चिमू पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे.

व्यापारी मतदार संघातून भूषण ठोंबरे व पुरूषोत्तम भन्साळी, तर हमाल मापाडी जलाल इमाम गवळी हे विजयी झाले आहेत. आ.नमिता मुंदडा यांच्या पॅनल मधून व्यापारी मतदार संघातून दोन व हमाल तोलाई मतदार संघातून 1 या तीन उमेदवारावरच समाधान मानावे लागले आहे. या निवडणूकीमध्ये माजी आ.संजय दौंड, माजी आ.पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नगरसेवक बबन लोमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *