नवी दिल्ली: देशात सलग 18 व्या दिवशी डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. परंतु पेट्रोलच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाही. दिल्लीत आज पहिल्यांदा डिझेलची किंमत पेट्रोल पेक्षाही वाढली असल्याचे दिसून आले. डिझेल 79.88 रूपये तर पेट्रोल 79.76 प्रति लिटर झाले आहे.
मागील 18 दिवसात डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 10.48 रुपयांनी तर पेट्रोलमध्ये 8.50 रुपयांनी वाढ झाली आहे. बुधवारी दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 0.48 पैसे वाढली. त्यामुळे डिझेल 79.88 तर पेट्रोल 79.76 प्रति लिटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोलचा भाव 86.54 रुपये आहे. तर डिझेल 78.22 रुपये आहे. मंगळवारच्या तुलनेत आज 46 पैशांची वाढ झाली. मंगळवारी मुंबईत डिझेल 77.76 रुपये होते. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 81.45 आणि 83.4 रुपये आहे. तर डिझेलची किंमत अनुक्रमे 70.6 आणि 77.17 इतकी झाली आहे.