# ‘खडकवासला’तून ५ हजार १३६ क्युसेक वेगाने विसर्ग.

पुणे: खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाचा वेग कायम असल्याने आज गुरूवारी विसर्गाचा वेग ५ हजार १३६ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांनी आता अधिकची काळजी घ्यावी.

पाऊस आणि मुठा नदीतून होणारा विसर्ग लक्षात घेता महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असून कोणतीही अडचण असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(020) 25506800
(020) 25506801
(020) 25506802
(020) 25506803

खडकवासला साखळी धरण पाणीसाठा (१३ ऑगस्ट, २०; स. ६ पर्यंत)

खडकवासला: १.९७ टीएमसी/१००%
पानशेत: ७.९२ टीएमसी/७४.३७%
वरसगाव: ७.७६ टीएमसी/६०.५०%
टेमघर: १.७६ टीएमसी/ ४७.४६%

एकूण पाणीसाठा: १९.४१ टीएमसी/६६.५८%
(गेल्या वर्षी आजच्या दिवशी: २९.१५ टीएमसी/१००%).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *