पुणे: रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या समवेत 17 फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन (अस्मा) पदाधिकारी यांची बैठक झाली. नवी दिल्लीतील उद्योग मंत्रालयात झालेल्या बैठकीत अस्माचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांच्यासह आर.डी. स्वामी, अपूर्व जानी हे पदाधिकारी सहभागी झाले होते. अस्माचे एप्रिल मध्ये गया (बिहार) येथे होणाऱ्या द्विवार्षिक अधिवेशनाचे निमंत्रण रेल्वेमंत्री यांना देण्यात आले. तसेच यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
अस्माचे धनंजय चंद्रात्रे यांनी 17 एप्रिल रोजी गया (बिहार) येथे होणाऱ्या द्विवार्षिक अधिवेशनात उपस्थित राहण्याचे निमंत्रण रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना देण्यात आले, त्यांनी ते स्वीकारले. तसेच यावेळी अस्माच्या विविध मागण्यांचे निवेदन रेल्वेमंत्री यांना देण्यात आले. तसेच विमा, सुरक्षा/ ट्रेस अलाउंस, राजपत्रित अधिकारी ची पोस्ट, संघटनेला मान्यता मिळावी, नाईट ड्यूटी ची सीलिंग हटविण्यात यावी, स्टेशन मास्टर्स च्या प्रशिक्षण कालावधीचे स्टायपेन्ड एरियस 4200 GP च्या हिशोबाने मिळावे, एमएसीपी ची अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 पासून व्हावी इत्यादी विषयांवर विस्तृत चर्चा केली. याबरोबरच लवकरच स्टेशन मास्टर्स सारख्या महत्वाच्या केडर च्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, अस्माच्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी तत्काळ डीजी/ एचआर आणि सीआरबीची भेट घेण्यास सांगितले आणि डीजी/ एचआरला तत्काळ बोलावून अस्मा ही एक चांगली संघटना आहे, त्यांच्या अडचणींबद्दल सकारात्मक उपाय शोधा, असे सांगितले. त्यानंतर रेल्वे मंत्रालयात डीजी/ एचआर आनंद खाती यांना भेटून त्यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी खाती यांनीही नवीन स्टेशन मास्टर्स चा प्रशिक्षण कालावधीचा एरिअर्स, सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप विमा, संघटनेची मान्यता, सुरक्षा/ स्ट्रेस भत्ता, राजपत्रित पद देणे आदी विषयांवर चर्चा करून हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे (अस्मा) राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी दिली.