आ.विनायक मेटे, डॉ.संतोष तावरे यांचा पुढाकार; 805 शेतकऱ्यांना 8 लाख रूपयांचे बियाणे देणार
पुणे: शिवसंग्राम किसान आघाडी व सावा सीड्स व सेमेनॅक सीड्स पुणे यांच्या वतीने व शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गरीब व गरजू शेतकऱ्यांना मोफत बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे. ही माहिती सावा सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संतोष तावरे यांनी दिली. हा कार्यक्रम बीड तालुक्यातील उमरद जहाँगीर येथे बुधवार, 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता होणार आहे.
बियाणे वाटपाचा कार्यक्रम हा शिवसंग्राम चे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सावा सीड्स चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संतोष तावरे, माजी उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळके, सर्वोच्च न्यायालयातील वकील विशाल जोगदंड, शिवसंग्राम चे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे, भारतीय संग्राम परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रभाकर धांडे यांच्यासह सावा सीड्स चे संचालक अरूण मुळे, सामाजिक कार्यकर्त्या पंकजा माने, शिवसंग्रामचे बीड जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा ढवळे, नविदुजुम्मा सय्यद, माजी सभापती नारायण काशिद, भानुदास जाधव, सुहास पाटील, अनिल घुमरे, बबनराव शिंदे, नवनाथ प्रभाळे, रामहारी मेटे, बबन मेटे, मिराताई डावकर, सुनील शिंदे, राजेंद्र आमटे, राहुल बनकर, बबन जगताप, बळीराम चव्हाण, शिवराम शिरगिरे उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून शिवसंग्राम चे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या प्रेरणेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुणे येथील सावा व सेमेनॅक सीड्सच्या वतीने गहू (कनक), हरबरा (दिग्विजय), संकरित भेंडी (राधा), वाल (कोकण भूषण), चाऱ्याची बाजरी (बाजरा नं1), असे गरीब व होतकरू अशा एकूण 805 शेतकऱ्यांना, 3 हजार 900 किलोग्राम व 252 एकर क्षेत्रावर पुरेल एवढे व सुमारे 8 लाख रूपये किंमतीची बियाणे मोफत वाटप करण्यात येणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसंग्राम बीडच्या वतीने हरिश्चंद्र तकीक, उद्धव तकीक, नवनाथ काशिद, नानासाहेब कडबाने, आबासाहेब सांगुळे, नवनाथ वांढरे, परमेश्वर भांबे, अनिल लाटे यांनी केले आहे.