औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर विभाग औरंगाबाद मुख्य परिसर तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व अभ्यासक्रमांसाठी सोमवारी (दि.आठ) ‘स्पॉट अॅडमिशन‘ फेरी राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके यांनी दिली.
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील सर्व ४५ विभाग तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व १० विभागात ‘ऑनलाईन‘ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या वर्षी ‘एम.फिल प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने यशस्वीपणे राबविण्यात आली. या संदर्भात प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ , प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके यांच्या उपस्थितीत मा.कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठक होऊन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका १५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन/ ऑफलाईन सुरु करण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागातील विषय, उपलब्ध प्रवेशित जागा, आरक्षण, शुल्क, पात्रता आदी सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, औरंगाबाद मुख्य परिसर, उस्मानाबाद उपपरिसर व समाजकार्य महाविद्यालय या सर्व ठिकाणी रिक्त जागांसाठी सोमवारी दि.आठ सकाळी १० ते १ दरम्यान स्पॉट अॅडमिशन देण्यात येणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या नाट्यगृहात ही फेरी राबविण्यात येणार आहे.
पदव्यूत्तर अभ्यासक्रम : एम.ए.- मराठी, हिंदी, ऊर्दु, पाली व बुध्दीझम, संस्कृत, स्त्री अभ्यास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास, भुगोल, विदेशी भाषा, मानसशास्त्र, अर्कालॉजी, फुले-आंबेडकर विचारधारा, योगशास्त्र, संगीत, आजीवन शिक्षण व विस्तार, बी.पी.ए, एम.पी.ए.
एम.एस्सी- पदार्थविज्ञान, प्राणीशास्त्र, इलेक्ट्रानिक्स, रसायनशास्त्र, जीव रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान,
एम.टेक- रसायन अभियांत्रिकी, बी.टेक- रसायन तंत्रज्ञान
बी.होक/ एम.व्होक – इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, ऑटोमोबाइ्रल तंत्रज्ञान
एम.बी.ए., एम.सी.ए, एम.टी.एम, मुद्रण तंत्रज्ञान,
एलएलएम, एम.कॉम, एम.आय.बी, डी.बी.एम, एम.एफ, ए, एम.ए.एम.सी.जे., एम.एड.एमपीएड, एम.लिब.आदी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेत एम.एस्सी कन्झव्र्हेशन बायोडायव्र्हसिटी , रुरल टेक्नॉलॉजी मास्टर ऑफ रुरल स्टडीज इन सोशिओ-कल्चरल अॅण्ड पॉलिटिकल अस्टेक्टस, एमआरएस इन रुरल इकॉनॉमिक्स बँकिंग अॅण्ड इंडस्ट्रीज यासह २१ कोर्सेसच्या प्रवेश सुरु आहेत. मुख्य परिसरात सामाजिक कार्य महाविद्यालय एम.एस.डब्ल्यू अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहेत.
उस्मानाबाद उपपरिसर: एम.एस्सी – सुक्ष्म जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जैव तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, गणित, जल व भूमी व्यवस्थापन, एम.बी.ए, एम.सी.ए, एम.ए.इंग्रजी, एम.पी.ए व एम.एड आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत.