# महावितरण प्रादेशिक सह व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ.नरेश गीते रुजू.

औरंगाबाद: महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे तत्कालीन सह व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यामुळे त्या पदावर डॉ. नरेश गीते (भा.प्र.से) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे डॉ.नरेश गीते यांच्याकडे सुपूर्द केली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार, २७ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या दालनात वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ.नरेश गीते यांच्याकडे सहव्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी सुपूर्द केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *