# भाजपा भटके विमुक्त आघाडी महिला मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.उज्वला कराड -दहिफळे.

मुंबई: आज भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.उज्वला कराड -दहिफळे यांची भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या महिला मराठवाडा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे . सदरील नियुक्ती प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, राज्यसभेचे खासदार डॉ.विकास महात्मे, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार, महिला प्रदेश संयोजक उज्ज्वलाताई हाके यांच्या हस्ते करण्यात आली आहे .

डॉ.उज्ज्वला दहिफळे या मराठवाड्यातील पहिल्या महिला प्लास्टिक सर्जन आहेत. संपूर्ण मराठवाड्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. रुग्णसेवेच्या माध्यमातून त्या गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा सहयोग आहे. मराठवाड्यात भाजपची मजबूत बांधणी करण्यासाठी त्यांच्यावर पक्षाने ही नवीन जबाबदारी दिलेली आहे लवकरच त्या मराठवाड्याचा दौरा करून कार्यकारिणी तयार करणार आहेत.

या निवडीबद्दल प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय सचिव पंकजा मुंडे व विनोद तावडे, खासदार पुनम महाजन, खासदार प्रीतमताई मुंडे, खासदार डॉ.भागवत कराड, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार अतुल सावे, आमदार रमेश कराड, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार तानाजीराव मुटकुळे, भाजप नेते प्रवीण घुगे, संजय केनेकर, विदर्भ प्रभारी धनराज गुट्टे आदी सर्व मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *