नागपूर: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या नागपुरातील अँड सतीश उके यांच्यावर जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे नागपुरातील घरी सकाळी सातच्या सुमारास छापे.
सहा तास चौकशीनंतर अँड सतीश उके व त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीकडून अटक. सतीश उके हे काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही वकील म्हणून काम पाहतात. विशेष म्हणजे उके यांनी गेल्या काही वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केल्या असून, पत्रकार परिषदांमधून ते भाजप नेत्यांवर आरोप करत आहेत.