पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय कठीण परिस्थितीतही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील तीनही कंपनीतील अधिकारी-कर्मचारी यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी सानुग्रह अनुदान देण्याचा शब्द पाळला आहे. त्यामुळे आता सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज मंगळवारी दुपारी 01:30 वाजता व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे झालेल्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील तीनही कंपनीतील अधिकारी-कर्मचारी यांना दिवाळी सानुग्रह अनुदान रक्कम देण्याबाबत चर्चा केली. तसेच सध्या कंपनीची आर्थिक परिस्थिती नाजूक असूनही कोरोनाचे संकट पाहता परंपरे नुसार सानुग्रह अनुदान 15500/9000 गेल्या वर्षी देण्यात आले होते. यावर्षी 20% कपात करून सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. ऊर्जा मंत्री यांनी योग्य व संयमी निर्णय घेतला आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके यांनी आभार मानले. व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे झालेल्या या मिटिंगमध्ये आमदार भाई जगताप, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार जे.एस. पाटील यांच्यासह संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके सहभागी झाले होते.