जालना: महिला तलाठी रेखा पुरुषोत्तम मानेकर, सज्जा निकलक, ता. बदनापूर जि. जालना (रा. समर्थनगर, जुना जालना) यांना आज दि. 31.08.2023 रोजी सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष 2000 रू. लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडले.
थोडक्यात हकिकत अशी की, यातील तक्रारदार यांनी स्वत:च्या नावाने तलाठी रेखा मानेकर यांचेकडे सातबारावरील अज्ञान पालनकर्ता (अ.पा.क) शेरा कमी करणेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला होता. परंतु तलाठी यांनी काम केले नाही. म्हणून तक्रारदार यांनी पुन्हा लेखी अर्ज केला. परंतु तरी सुद्धा काम न करता तक्रारदार यांना 2000 रू. लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्यूरो जालना येथे तक्रार दिली. या लाच पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 2,000 रू लाचेची मागणी करून 2000 रू स्वीकारण्याचे मान्य केले.
आज दि. 31.08.2023 रोजी सापळा कारवाई दरम्यान यातील आलोसे यांनी पंचासमक्ष 2000 रू. लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. तलाठी यांचेकडून 2,000 रू. लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. याबाबत आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे बदनापूर ता.बदनापूर जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई सापळा अधिकारी किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश बुजडे, गणेश चेके, जावेद शेख, कृष्णा देठे यांच्या पथकाने केली.