# औरंगाबादेत महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण.

 

प्रतिकात्मक छायाचित्र

औरंगाबाद:  कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा महाराष्ट्र वर्धापन दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या निर्देशानुसार महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या 1 मे रोजी उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई  यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण  करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उद्या सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री यांच्या हस्ते होणार असून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत  मर्यादित जणांच्या उपस्थितीत होणार आहे. जिल्ह्यात केवळ उच्च न्यायालय मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालय या दोन ठिकाणीच ध्वजारोहण होणार आहे, इतरत्र कुठेही ध्वजारोहण होणार नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण समारंभास उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम. गोंदवले यांचीच उपस्थिती राहणार आहे. तसेच बँड पथक आणि सलामी पथकात पाचपेक्षा कमी पोलिसांची उपस्थिती राहील, असे श्रीमती मैत्रेवार यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *