“रस्त्यावर मुतणाऱ्या मुलाची तक्रार करायला गेले असता मुलाचा बापच दुसऱ्या मजल्यावरून खाली मुतत होता”

माजी आमदार अनिल गोटे यांचा देवेंद्र फडणवीस व भाजपाला खोचक टोला

मुंबई: सध्याच्या राजकारणाने खूपच खालची पातळी गाठली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला कॅन्सरने ग्रासले आहे. भाजपा आणि माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून शासकीय यंत्रणाचा गैरवापर करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तक्रार करायची तरी कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धुळे- नंदूरबार जिल्हा प्रभारी अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीत तक्रार कुणाकडे करावी, असे म्हणत अनिल गोटे यांनी, रस्त्यावर मुतणाऱ्या मुलाची तक्रार करण्यासाठी एक सभ्य गृहस्थ संतप्त होवून त्याच्या वडिलांकडे तक्रार करायला जातात, तर मुलाचे वडीलच घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली मुतत होते, अशा खोचक शब्दात फडणवीस व भाजपावर टीका केली आहे. अनिल गोटे यांचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चर्चा रंगली आहे. गोटे यांचे हे पत्र वाचकांसाठी आम्ही जसेच्या तसे येथे देत आहोत.

पाताळयंत्री कपटी कारस्थानी देवेंद्र फडणवीसांच्या नीच डावपेचाने भाजपला राज्यसभेत कलकीत विजय!

-तुरुंगातून निवडणूक लढवायला स्वातंत्र्य, पण मतदानाला नाही!

-पप्पू कलानी भुजबळांना मतदान करण्याचे स्वातंत्र्य, पण देशमुख, मलिकांना नाही!

राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांचे सडेतोड वक्तव्य

देवेद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या खेळीमेळीच्या निर्भेळ राजकारणाला लागलेला कॅन्सर आहे. सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून स्वतःच्या स्वार्थासाठी शासकीय यंत्रणाचा गैरवापर करण्याच्या सर्व मर्यादा त्यानी मोडीत काढल्या आहेत राज्याचे दुर्देव असे की भाजपच्या शिर्शत नेत्याचे आशिर्वाद आहेत. ‘एक मुलगा रस्त्याकडे तोड करून मुतत होता. त्या मुलाने यापुढे असे कृत्य करू नये. यासाठी रस्त्याने जाणाऱ्या एका सभ्य गृहस्थाने मुलाला धमकी की ‘थांब तुझ्या बापाकडेच तकार करता तो सभ्य गृहस्थ अतीशय सतापात मुलाच्या घराकडे निघाला. समोरच दृष्य पाहून त्या सभ्य माणसाला धक्काच बसला. मुलाचे वडील दुसऱ्या मजल्यावरून खाली मुतत होते. आज भाजपची अशीच काहीशी अवस्था झाली आहे. सामान्य नागरीकाने दाद तरी कुणाकडे मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपाला राज्यसभेच्या निवडणूकीत मिळालेला विजय हे रणांगणावरचे यश नाही. अदानीच्या खाजगी बंदरावर उतरवलेल्या हजारो कोटी रूपयाच्या अमली पदार्थाच्या पैशातून किती मिळालेल्या कलकीत विजय होय! देवेद्र फडणवीस यानी आपल्याच पक्षातील सहकारी नेत्यांची बेमालुमपणे वाट लावली. जनाधार असलेल्या बहुजन नेत्यांविरुध्द दिल्लीश्र्वराकडे चहाडया चुगल्या करायच्या! त्याची मने कलुषीत करायची, ज्याच्या खांदयावरून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहचले असे बहुजनाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या राजकीय वारस सौ. पकजाताई याचा विधानसभेत पराभव व्हावा यासाठी विरोधकाना रसद पुरवली राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी दिली जाईल असे वातावरण निर्माण करून धोका दिला आयुष्याची ऐन उमिदीची 40 वर्ष शेटा भटाचा भारतीय जनता पक्ष गाव कुसापर्यंत पोहचवला, त्या नाथाभाऊनी पक्ष सोडून बाहेर पडावे अशी व्यूह रचना करून त्यांना बाहेर पडायला भाग पाडले. जेणे करून पक्षात आपल्याला कोणीच स्पर्धक राहता कामा नये. इतका कपटी व पाताळमंत्री राजकारणी गेल्या 55 वर्षांच्या राजकारणाच्या प्रदीर्घ वाटचालीत पाहिला नाही. अतीशय विधिनीषेध शुन्य व उघडपणे कुठल्याही थराला जाण्याची कपटी कारस्थानी, दगलबाज उच्चवणीय राजकारण्याची नोंद महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घ्यावीच लागेल. राजकारणातील दुसरे अनाजीपंत अशीच नोंद व्हावी. भविष्यातील लोकशाहीचे स्वरूप कसे असेल ? याचा ट्रेलरच भाजपने

महाराष्ट्रात दाखवून दिला आहे. काही किरकोळ हरकती निर्माण करायच्या, पाळीव पत्रकाराना हाताशी धरून दिवसभर टिव्ही चायनलवर तेच वळण दळत रहायचे ! शंभर वेळा खोट सांगीतल्या नंतर एखदा खर वाटत. अशा ग्लोबेल्स नितीचा वापर करून जनतेमध्ये समभ निर्माण करायचा.. अधिकान्यावर दबाव आणून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून घ्यायचे हेच धोरण आणि तोरण ! न्यायालयाच्या चार भितीच्या आत माननीय न्यायाधीश जे बोलातील त्यालाच न्याय म्हणायचा ! आपली प्रथा आणि परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर तुरुगातील कंदयाना निवडणूक लढवण्याचे स्वातंत्र्य आहे. इडीच्या कस्टडीत असताना माननीय छगन भुजबळांना मतदानाचा हक्क बजावता आला. टाढा सारख्या गंभीर गुन्हयात तुरुगात असलेल्या पप्पू कलानीला मतदानाचा हक्क बजावता आला. पण त्याच तपासी यंत्रणेच्या कच्च्या कैदेत असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलीक या दोन कच्या कैदयांना मात्र मतदानाचा हक्क नाकारला यालाच न्याय म्हणायचा !!!

माझे मत असे आहे की, अमिताभ बच्चनच्या अंधा कानून चित्रपटाची सुधारून वाढवलेली महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी सकल्पना असावी या सकल्पनेवर अधाकानून भाग- 2 नवा चित्रपट निघू शकतो. असे स्पष्ट सडेतोड पत्रक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे यानी आज प्रसिध्दीस दिले आहे.

आपला

अनिल गोटे

धुळे, नंदुरबार जिल्हा प्रभारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *