पुणे: राज्यात ३ ते ६ जुलैदरम्यान अतिवृष्टी, मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. उर्वरित कोकणसह मुंबई व सातारा भागात मुसळधार तर उर्वरित राज्यात मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज पुणे हवामान वेधशाळेने वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात अतिवृष्टी, मुसळधार आणि मध्यम असा पाऊस ३ ते ६ जुलै दरम्यान पडेल. रत्नागिरीत ३ जून तर रायगड येथे ४ जूनला अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उर्वरित कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या ठिकाणी ३ ते ६ जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस होईल. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूरसह मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.