पुणे: जागतिक मासिक पाळी स्वछता दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हींगतर्फे वय वर्ष 10 ते 30 वयोगटातील मुली व महिलांसाठी विनामूल्य ऑनलाईन पवित्र वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. दि 29, 30 आणि 31 मे या कालावधीत दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत हा कार्यक्रम होईल. विशेष म्हणजे या शिबिरात घरबसल्या सहभागी होता येणार आहे.
दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच धर्तीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच महाराष्ट्र शासनाकडूनही या दिवशी जनजागृती केली जाते. स्त्रियांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मासिक पाळी महत्त्वाची भूमिका बजावते. याच अनुषंगाने आर्ट ऑफ लिव्हींगतर्फे मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेसंदर्भात काळजी कशी घ्यावी, तसेच मासिक पाळीबाबत समाजात असलेले गैरसमज याबद्दलही माहिती दिली जाणार असल्याचे आर्ट ऑफ लिव्हींगच्या (पुणे) पीआर हेड व लाईफ कोच कुमकुम नरेन यांनी सांगितले.
मासिक पाळी दरम्यान पौंगडावस्थेतील मुलींनी आरोग्य व स्वच्छतेची कोणती व कशी काळजी घ्यावी. मासिक पाळीच्या काळातील जंतुसंसर्ग होण्याचे धोके याबाबत नम्रता, अश्विनी, श्वेता या टीचर्स मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ध्यान व प्राणायामाची प्रात्यक्षिकासह माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://bit.ly/2WR8c9b या लिंकवर ऑनलाईन नाव नोंदणी करावी लागणार आहे.
Very good news and also your guideline is very useful thanks.