# इंस्टाग्रामवरील मैत्री: मुंबईच्या तरुणीवर जालन्यात बलात्कार.

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसेही उकळले

जालना: इंस्टाग्रामवरील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर तरूणाने मुंबईच्या तरूणीस जालन्यात बोलावून तिच्यावर बलात्कार करून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तरुणीस ब्लॅकमेल करून गूगल पेद्वारे पैसे उकळून लूट केली. याप्रकरणी नासेरखान अफसरखान या तरूणावर गुन्हा दाखल करून अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हिंदनगर, नवीन मोंढा जालना येथील नासेरखान अफसरखान (वय 27) हा इगल ब्रॉडबॅन्ड सर्विसेस जिंदल मार्केट जालना येथे ऑपरेटर म्हणून कामाला आहे. कार्यालयाचे वायफाय फ्रिमध्ये वापरण्यास मिळत असल्याने नासेर खान हा नेहमी सोशल मिडीयावर सक्रिय होता. दरम्यान मुंबई येथील एका तरुणी सोबत त्याची इंस्टाग्रामवर मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर शारीरिक संबंधात झाले.

त्या तरूणीला जालना येथे बोलावून जिंदल मार्केटमधील एका दुकानात आणि रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजवर नेऊन नासेर खान याने बलात्कार केला. त्यावेळी त्याने त्या तरुणीचे अश्लील फोटो काढले होते. या फोटोच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून गुगलपेने लाख रुपयांवर रक्कम उकळली.

याप्रकरणी ओशीवरा पोलीस ठाणे मुंबई येथे सदर तरुणीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून सदर बाजार पोलीस ठाण्यात वर्ग केला होता. दरम्यान, आरोपी नासेरखान अफसर खान याच्या सदर बाजार पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याची न्यायालयाने 30 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, स.पो.नि. मंजुषा सानप, कर्मचारी समाधान तेलंग्रे, सुधीर वाघमारे, फुलचंद गव्हाणे, योगेश पठाडे यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *