पुणे: मध्यमहाराष्ट्रातील घाटमाथा आणि कोकणात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस 26 ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. तर राज्यातील उर्वरित भागात मराठवाडा व विदर्भात तुरळक मध्यम स्वरूपाचा पाऊस राहिल असा असा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
अरबी समुद्र आणि आसपासच्या भागात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे घाटमाथा, कोकणात अतिमुसळधार पडत असलेला पाऊस कमी झाला असून, आता केवळ मुसळधार स्वरूपात पडणार आहे. मराठवाडा व विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मध्य प्रदेशाच्या उत्तर पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. मात्र, त्याचाही प्रभाव कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्यमहाराष्ट्राचा घाटमाथा आणि कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे.