# मध्यमहाराष्ट्रातील घाटमाथा, कोकणात 21 ऑगस्टपर्यंत मुसळधारेचा अंदाज.

पुणे: राज्यातील मध्यमहाराष्ट्राचा घाटमाथा आणि कोकणात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस 21 ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. तर मराठवाडा व विदर्भात देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस असाच राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, 21 ऑगस्टपर्यंत पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यातील घाटमाथा तर मुंबई, कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागात मुसळधार ते अतिमुसळधार तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार अहमदनगर या भागातील पाऊस कमी झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील मध्यमहाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर त्याचप्रमाणे कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तर छत्तीसगडच्या भागावर असलेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तरपूर्व मध्यप्रदेशात आहे. त्याचबरोबर दक्षिणपूर्व छत्तीसगड ते पूर्व उत्तर प्रदेश तसेच दक्षिण गुजरातवर चक्रीय स्थिती आहे. पुढील 24 तासात ही चक्रीय स्थिती पूर्व उत्तर भागाकडे सरकरणार आहे. दक्षिण अरबी समद्राकडून ईशान्य भारताकडे बाष्पयुक्त वारे वाहत असून, त्याचाही प्रभाव कायम आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. 19 ऑगस्टला बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या सर्व प्रकारच्या स्थितीमुळे या भागात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *