# पदवीधर निवडणूक: सर्व मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू.

बीड: भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार निवडणुकीचा कार्यक्रम 2 नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक-2020 ची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात निवडणूक कालावधी पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

ज्या ठिकाणी मतदान होणार आहे. त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंध करण्यास राहूल रेखावार, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सदर ठिकाणी 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदान केंद्रावरील संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत.

तसेच 10 वी व 12 वी बोर्डाची परीक्षा काही मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या परिसरात असून तेथील विद्यार्थी व कर्मचारी यांचे हॉलतिकीट व ओळखपत्र पाहूनच परीक्षा केंद्रावर जाणेसाठी परवानगी देण्यात यावी. सदरील परीक्षा केंद्रावरील परीक्षा संपल्यानंतर संबंधित विद्यार्थी व कर्मचारी हे परीक्षा विषयक कामकाज संपवून लगेचच परीक्षा केंद्रावरुन बाहेर पडतील याची खात्री उपस्थित पोलीस कर्मचारी यांनी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *