अंबाजोगाई: बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने बुधवार, ५ ऑक्टोबर २०२२ रोजी नियोजित ‘विश्वशांती महाविहार’, ‘लुंबिनी पार्क, मांडवा रोड, अंबाजोगाई (जि.बीड) येथे भव्य धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आदरणीय भदन्त धम्मसार (किल्लारी, जि.लातूर) यांचे धम्मप्रवचन होणार आहे. तर उद्घाटक म्हणून ॲड. संघराज रूपवते (उच्च न्यायालय, मुंबई) आणि समारोप सत्रात खा. सुधाकरराव शृंगारे (लातूर लोकसभा) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. स्वरविहार हा बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम आणि समारोप अशा चार सत्रात होणार आहे.
बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत (चार सत्रांमध्ये) नियोजित ‘विश्वशांती महाविहार’, ‘लुंबिनी पार्क, मांडवा रोड, अंबाजोगाई (जि. बीड) येथे हा महोत्सव होईल, बुधवारी पहिले सत्र उद्घाटनाचे असेल सकाळी उद्घाटन होईल. १०.३० वाजता ॲड. संघराज रूपवते यांच्या हस्ते होईल. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून अजिंक्य चांदणे (प्रदेशाध्यक्ष, आरपीआयए), प्रा. सुकुमार कांबळे (राष्ट्रीय अध्यक्ष – डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया), संदीप हनुमंत उपरे (चलो बुद्ध की ओर अभियान, बीड) तर यावेळेस कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रा. एस. के. जोगदंड, ॲड. अनंतराव जगतकर या मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळेस प्रा. सुकुमार कांबळे, अजिंक्य चांदणे आणि संतोष हनुमंत उपरे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
प्रवचनाचे दुपारचे सत्र १ वाजता सुरू होईल, यावेळेस भदन्त धम्मसार ( किल्लारी, जि. लातूर) हे धम्म प्रवचन देतील. तिसरे सत्र हे स्वरविहार हा बुद्ध व भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम असे आहे. हे सत्र दुपारी २ वाजता ते ४ वाजता या कालावधीत होईल, चौथे सत्र म्हणजे धम्म महोत्सवाचा समारोप होय, हे सत्र दुपारी ४ वाजता सुरू होईल, समारोप सत्रास प्रमुख अतिथी म्हणून खा. सुधाकरराव शृंगारे (लातूर लोकसभा) तर समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी आमदार सौ. नमिताताई मुंदडा (केज विधानसभा मतदारसंघ) या असतील. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी नरेंद्र काळे, प्रभाकर वाघमारे (उद्योजक), कबीरानंद कांबळे (सामाजिक कार्यकर्ते, छत्रपती संभाजीनगर) या मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने होईल.
अंबाजोगाई बस स्थानक ते धम्म महोत्सवाच्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी सकाळी १० ते ११.३० आणि सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत बसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तरी महोत्सवात धम्म प्रेमी जनता आणि बौध्द उपासकांनी सहभागी होण्याचे आवाहन व्यवस्थापन समितीचे प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. डी. जी. धाकडे, ॲड. सुनील सौंदरमल, राजेंद्र घोडके, डॉ. सर्जेराव काशिद, अशोक भोजने, प्रा. मोहिनी अतुल सिताप, उत्तमराव डोंगरे यांनी केले आहे.