ढोल ताशा पथकाच्या तालावर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

अंबाजोगाई: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शनिवार, 14 मे रोजी शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सार्वजनिक जयंती उत्सव समिती अंबाजोगाई यांच्या वतीने भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांनी दिली आहे.

अंबाजोगाई शहरात मागील सहा वर्षांपासून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात. जयंती उत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. यावर्षी भव्य सांस्कृतिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पारंपारिक वाद्यांचा गजर आणि राज्यातील विविध ठिकाणाहून आलेले शिवकालीन वेशभूषेतील कलाकार कला सादर करणार आहेत. समस्त अंबाजोगाईकरांनी मिरवणुकीत सहभागी व्हावे अशी विनंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण महिला आणि पुरुषांचे शिवतांडव ढोल ताशा पथक, कर्जत (रायगड), रेणुका माता संबळ वाद्यपथक, परळी वै., सातारा येथील पथकाचे मर्दानी खेळ, संभाजी राजे मावळे वेशभूषा, मूर्तीचे विशेष आकर्षण असे आहे. मिरवणुकीची वेळ शनिवार, 14 मे 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता असून मिरवणुकीची सुरुवात भट गल्ली, पाटील चौक, अंबाजोगाई येथून होईल. जयंती उत्सवानिमित्त आयोजित मिरवणुकीत अंबाजोगाई शहरातील शिव-शंभू प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांनी केले आहे. जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजक शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सार्वजनिक जयंती उत्सव समिती अंबाजोगाईचे सचिव शुभम लखेरा, उपाध्यक्ष सचिन तौर, सदस्य प्रशांत सुरवसे, अनिल कदम, रोहित गंजेवार, महेष पाथरकर तसेच गणेश (भैय्या) कदम मित्र मंडळ यांनी पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *