गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात

१ व ५ डिसेंबरला मतदान; ८ डिसेंबरला मतमोजणी

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुरूवारी (३ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. तसेच निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकीचं मतदान वेगवेगळ्या दिवशी होणार असलं तरी निकाल एकाच दिवशी घोषित होणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम – पहिला टप्पा

नोटिफिकेशन – ५ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – १४ नोव्हेंबर

अर्जांची छाननी – १५ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर

मतदान – १ डिसेंबर

दुसऱ्या टप्प्यातील मतदान-  ५ डिसेंबर

निकाल घोषित- ८ डिसेंबर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *