अंबाजोगाई: ट्रकमध्ये गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीसांना मिळाली. गुरूवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी शहरातील भगवानबाबा चौक परिसरामध्ये ही ट्रक थांबवली. यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. पोलीसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून सुटका जप्त केला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीसांना एका ट्रकमध्ये (एम.एच.-04जे.के.-4782) गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांनी हा ट्रक शहरातील भगवानबाबा चौक परिसरात थांबवून तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये सुमारे तीस लाख रूपयांचा गुटखा आढळून आला. चालकाला ताब्यात घेत ट्रकसह 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात प्रक्रिया सुरू आहे.