नाही विरोध नाही आंतरपाट
आम्ही घातल्यात वरमाला
मग या सरकारला विरोध कशाला…
पाच वर्षे आम्ही चालणार
घालून एकमेकांच्या हातात हात
खिचडी नाही ही आहे तिघांचे सरकार…
पोलीस बदल्या काय अन् काय नगरसेवक फोडाफोडी
आमचे तर आहेत एकमेकांच्या हातात हात
मग कशाला आता सरकारमधील आंतरविरोधाची बात…
-विलास इंगळे