# हल्ला बोल.. आले आले एकदाचे राफेल.. आता बाकी सब फेल…

आले आले म्हणता एकदाचे आले राफेल
आता पाकची बसणार पाचावर धारण
अन् चीनचे होणार सगळे प्लॅन फेल…

करून होमहवन करू पूजन राफेलचे
आता राफेलच ठरणार देशाचा तारणहार
दुश्मनांना धडकी भरवून करणार एकेकाचा संहार…

राफेल आले तो दिवस असे खास बाकी सब बकवास
आता राफेलच गेम चेंजर ठरणार
म्हणून त्याच्या आगमनाचा सोहळा ठरला असा खास…

बघून राफेलने उडवलेला धुरळा झालो आम्ही धन्य पाहून हा सोहळा
बातम्यातील अँकरचा पाहून जोश दुश्मनांचाही उडून जाईल होश…
-विलास इंगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *