मिशीवाल्याला आवडे मिशा
म्हणे आता काढा रामाला मिशा..
काय ही ओढवली दशा
प्रसिद्धीसाठी करून घेतला हशा…
कधी म्हणे खा अंबे होईल पोर
बाष्कळ बडबड करून शिरजोर..
माथी भडकवून करी तरूण कमजोर
स्वतः चे महत्व वाढवून होई थोर…
वेळीच ओळखा तरूणांनो हा कावा
तुमच्या कामाचा नाही हा बावा..
व्हा शिकून मोठे वाटेल हेवा
बळी पडू नका हा तर धूर्त कावा…
-विलास इंगळे