तुझं वय काय, तू करतोस काय, तू बोलतोस काय?
तू गोपी हाय का, पडवळ हाय, आम्ही हाय तोपर्यंत आमचा नाद करायचा नाय..?
तू मोदींनाही म्हणला हाय हाय, चाटुगिरी करून आमदारकी गळ्यात पाडून घेतली हाय..
तू गोपी हाय का, पडवळ हाय, आमचा नाद करायचा नाय..?
तुझं वय काय, तू करतोस काय, तू बोलतोस काय, तुला कोरोना माहितचं नाय?
तू आव्हाडांना विचार, धनंजयला विचार ते सांगतील कोरोना हाय काय..
तू गोपी हाय का पडवळ हाय, आमचा नाद करायचा नाय..?
तू करतोस काय, तू बोलतोस काय, बोलून तुझं वय वाढणार नाय?
हा महाराष्ट्र हाय इथं चाटुगिरीला थारा नाय, आमचा नाद करायचा नाय..?
तुझं वय काय, तू बोलतोस काय, तू करतोस काय, पंढरपूर काय तुझ्या बाचं हाय?
विठ्ठल सगळ्यांची माऊली अन् बाप हाय, आमचा नाद करायचा नाय..?
इथं बोलून थकले अन् सत्तेबाहेर फेकले, त्यांना विचार आम्ही आहोत काय..
आम्ही पावसात भिजलो पण नाही थिजलो, आमचा नाद करायचा नाय..?
तुमचा बा पण करतो आमच्याशी सल्ला मसलत, त्यांना ठावं हाय आम्ही आहोत काय..
तू तर अजून बच्चा हाय, आमच्याशी नाद करायचा नाय..?
-विलासराव
हाहा.यांची दखल कशाला घेता?