पुणे: गेल्या काही दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. या पट्ट्याच्या प्रभावामुळे कोकण आणि मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस सुरूच राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकण, मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते अतिवृष्टी असा पाऊस पडत आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू आहे. पुढील पाच दिवस कोकण व मध्यमहाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासात पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे: मालवण-110, देवगड-100, दहिगाव-80, पाचोरा-60, महाबळेश्वर-50, बदनापूर-80, औरंगाबाद-50, नेर-6, लाखणी- 50, ताम्हिणी-90, अबोणे-70, डुंगरवाडी-40