पुणे: आगामी चार दिवस कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह मुंबईत मुसळधार पाऊस तर उर्वरित राज्यात काही भागात मध्यम तर बहुतांश भागात हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ या भागात कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात १५ ते १८ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. तसेच नाशिक १५ जुलै, पुणे घाटमाथा १५ ते १७ जुलै, कोल्हापूर, सातारा १५ व १६ जुलै रोजी मुसळधारेचा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या चोवीस तासात जोर कमी: राज्यात गेल्या चोवीस तासात पावसाचा जोर कमी झाला असून मालवण ११०, सावंतवाडी ९०, मुंबई, पालघर प्रत्येकी ७०, दौंड ४०, किनवट ६०, वर्धा ४० मिलिमीटर तसेच. घाटमाथा भागातही सरासरी २५ मिमी पावसाची नोंद झाली.