# गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍या हस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना मदत.

पुणे: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार यांना 1 लाख रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरवण्‍यात आले. पुण्‍यात त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गृहमंत्री देशमुख म्‍हणाले, आजी या वयातही परिवार चालविण्‍यासाठी काम करतात. त्‍यांना शासकीय योजनेतून योग्‍य ती मदत दिली जाईल, असेही ते म्‍हणाले.

दरम्यान, शांताबाई बाळू पवार (रा.गोसावी वस्ती, हडपसर पुणे) या दाण्डपट्टा, लाठी काठी फिरवणे या ऐतिहासिक कला शास्त्रोक्त पद्धतीने सादर करून आपली उपजीविका भागवतात. दोन दिवसांपूर्वी लाठी काठी फिरवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांची विदारक परिस्थिती समोर आल्याने याची तातडीने दखल घेऊन मदत देण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्‍या ‘भरोसा सेल’मार्फत ज्‍येष्‍ठ नागरिकांना मदत केली जाते, आतापर्यंत 15 हजारांहून अधिक ज्‍येष्‍ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्‍यात आली आहे. पोलीस विभागामार्फत अधिकाधिक मदत देण्‍याचाही प्रयत्‍न केला जाणार असल्‍याचे सांगून जिल्‍ह्यातील गणेशोत्‍सव तसेच बकरी ईद च्‍या पार्श्‍वभूमीवर पोलीस विभागाचा आढावा घेतल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. यावेळी शांताबाई पवार यांनी कसरतीचे काही प्रकार करुन आपण या वयातही आरोग्‍यसंपन्‍न असल्‍याचे दाखवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *