पुणे: महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य वशिष्ठ सोनकांबळे, महाराष्ट्र राहूल गांधी विचारमंच व सोलापूर कामगार संघटना जिल्हाध्यक्ष बाबुलाल जाधव, महाराष्ट्र राहूल गांधी विचार मंच यांच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त कोरोना महामारीच्या संकट काळामध्ये २२ मार्चपासून ते आजपर्यंत हद्दवाद भागामंध्ये जनतेची सेवा करण्यासाठी दवाखाना सुरु ठेऊन रुग्णांवर उपचार केले. यामुळे महाराष्ट्र राहूल गांधी विचारमंचच्या वतीने डॉक्टर अप्पासाहेब बगले यांचा सत्कार सोलापूर शहर जिल्हा मागासवर्गीय विभागाच्या अध्यक्षा सौ.प्रमिलाताई तुपलवंडे यांच्या हस्ते शाल ट्राफी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वशिष्ठ सोनकांबळे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव प्राचार्य राहूल बोळकोटे होते. यावेळी अनिल म्हस्के, व्ही.डी. गायकवाड, सुनील साबळे, भारत चौगुले, दयानंद एकलगे, उमेश लोखंडे, गौतम बनसोडे, टिळक बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुलाल जाधव यांनी केले.